कंगना रनौत प्रकरण: 'त्या' महिला जवानाची पतीसह बदली

03 Jul 2024 17:28:17
Kangana Ranaut
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशाच्या मंदी मधून लोकसभा खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्या कथित कानशिलात लागवणाऱ्या सीआयएसएफच्या महिला जवानासह तिच्या पतीची देखील बदली करण्यात आली आहे.
 
 
भारतीय जनता पक्षाची खासदार अभिनेत्री कंगना रनौतला सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने चंदीगड विमानतळावर कानशिलात लगावली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आता या महिलेसोबत तिच्या पतीचीही बदली झाली आहे. या घटनेनंतर कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले होते मात्र, आता त्यांची बंगळुरू येथे बदली करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0