- जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला मान : ‘सीएस’च्या परिश्रमाचे चीज
वाशिम :
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या (National Health Program) जिल्हा शल्य चिकित्सक रॅंकिंगमध्ये राज्यात वाशिमचा द्वितीय क्रमांक आल्याने राज्यात वाशिम जिल्ह्याचे नाव आणखी उंचावले आहे.
जिल्ह्याला पहिल्यांदाच हा मान मिळाला असून, यानिमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सका (सी.एस.) डाॅ.अनिल कावरखे यांनी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून घेतलेल्या परिश्रमाचे चीज झाले आहे.
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनलयाकडुन विविध राष्ट्रीय आरोग्य कायक्रमाचे रँकिंग करण्यात येते. जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. अनिल कावरखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. पी.एस. ठोंबरे यांच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयात देण्यात येणाèया आरोग्य सेवांची यंदाही पडताळणी करण्यात आली तसेच पथकाने आरोग्य कार्यक्रमांची पाहणी केली. या पथकाच्या पाहणीमध्ये सी.एस. डाॅ. कावरखे यांच्या अधिनस्त असलेल्या वाशिम जिल्हयातील सर्व रुग्णालयांत दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा सेवा तपासल्या गेल्य. यामध्ये माता व बालकांना उकृष्ठ दर्जाच्या सेवा पुरवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.
लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना यामध्येही उत्कृष्ट सेवा बघायला मिळाली. हृदयरोग, उच्च रक्तदाब, डायबीटीज या रूग्णांना योग्यरित्या हाताळुन त्यांना पुढील उपचारासाठी याेग्य मार्गदर्शन केल्याचे पाहणीत आढळले. कॅन्सर आजारावरील उपचार आणि त्यांच्यावर अदययावत डायलिसीस सेवा देण्यात वाशिम जिल्हा रूग्णालयाने केलेली कौतुकास्पद कामगिरी पथकाने अधोरेखित केली. आजारी नवजात शिशु करीता एस.एन.सी.यु. ही सेवा अत्यंत जबाबदारीपुर्वक पार पाडल्या जात असल्याचे निदर्शनास आले. कुपाेषित बालकांसाठी पाषण पुर्नवसन केंद्र (एन. आर.सी.) तसेच क्रिटीकल रुग्णांसाठी आय.सी.यु. तसेच माेठ्या व लहान शस्त्रक्रिये करीता अत्याधुनिक व सुसज्ज शस्त्रक्रियागृह, माेतीबिंदु शस्त्रक्रिया, रक्तपेढी, साेनाेग्राी व सी. टी. स्कॅन अश्या प्रकारच्या उकृष्ठ दर्जेदार सेवा वाशिम जिल्हयातील रुग्णांना पुरविण्यात अधिकाऱ्यांना यश आले.
तसेच जिल्हयात राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या ५ हृदयशस्त्रक्रिया मोफत करण्यात आलेल्या आहेत. याचीच पोचपावती म्हणुन जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. अनिल कावरखे यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सक रॅंकिंगमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला.
पिछाडीवर राहण्याचा ठपका पुसून काढला
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या रॅंकिंगमध्ये यापूर्वी वाशिम जिल्हा हा पिछाडीवर राहायचा. गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागाने कमालिच्या सुधारणा करीत सर्वसामान्यांपर्यंत सुलभरित्या आरोग्य सेवा पुरविल्या तसेच आरोग्य उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. पी.एस. ठोंबरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे यंदा राज्यात वाशिम जिल्हा दुसऱ्या स्थानी झेपावला. यामुळे साहजिकच राज्याच्या आरोग्य क्षेत्रात वाशिम जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या रँकिंगमध्ये यापूर्वी वाशिम जिल्हा नेहमीच पिछाडिवर राहायचा. रॅंकिंगमध्ये वाशिम जिल्हा अग्रेसर कसा राहिल, याबाबत ‘ॲक्शन प्लान’ आखण्यात आला. त्याची प्रभावी अंमलबजावणी डाॅ. कावरखे व डाॅ. ठोंबरे यांनी केली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजनबध्द कार्यक्रम राबवुन यश संपादन केले. राज्यात वाशिम जिल्हा द्वितीय स्थानावर आल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेले प्रयत्न सार्थकी लागले, अशी भावना यावेळी वाशीम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी व्यक्त केली.
नागरिकांना दर्जेदार व विहित वेळेत आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजनपूर्वक सातत्य राखून अविरत सेवा बजावली. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांघिक प्रयत्न केले. या सर्वांच्या सहकार्यातूनच आम्ही राज्यात द्वितीय रॅंक मिळवू शकलो. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. मॅडम व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. भविष्यात अजून प्रभाविपणे आरोग्य सेवा देण्यावर आमचा भर राहील. निश्चितच भविष्यात पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी प्रयत्नशिल राहू, असा विश्वास जिल्हा रुग्णालय वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल कावरखे व्यक्त केला.