रविंद्र चौधरी महावितरण अचलपूर विभागाचे नवे कार्यकारी अभियंता

27 Jul 2024 11:47:07
 
Ravindra Chaudhary
 
अचलपूर:
अचलपूर येथील कार्यकारी अभियंता संजय श्रृंगारे यांची नागपूर शहर मंडल कार्यालयात बदली झाल्यामूळे त्यांच्या जागी नवे कार्यकारी अभियंता म्हणून रविंद्र चौधरी यांनी पदभार स्विकारला आहे. या निमित्ताने अचलपूर विभागाच्या हॉलमध्ये संजय श्रृंगारे यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
 
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १.३० वाजता स्नेहभोजनाने झाली आणि संध्याकाळी ५.०० वाजता निरोप समारंभ रविंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी संजय कुटे, संजय पुरी, उपकार्यकारी अभियंता श्रीमान कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. संजय श्रृंगारे यांनी २०२१ ते २०२४ पर्यंत अचलपूर विभागात कार्यभार सांभाळला आणि अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकरी, कामगार आणि गरीब ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. सोबतच विविध समाजिक कार्यक्रमाचेही आयोजन केले. संजय श्रृंगारे यांच्या निरोप समारंभासाठी नागे, राजेश तिवारी, सहायक अभियंता हर्षपाल सावंतकर, पाकधाने, सचिन नळकांडे, विजय किटे, पवन सातपुते, नरेंद्र भुजाडे, काले, भलावी, काळे, मयूर जाधव, सचिन ठाकरे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाचे संचालन निलेश मानकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पाकदाने यांनी केले.
Powered By Sangraha 9.0