दुचाकी उसळून पडल्याने महिलेचा मृत्यू

    26-Jul-2024
Total Views |
-जीवघेणा ठरला स्पीडब्रेकर

Woman dies(Image Source : Internet/ Representative) 
मोर्शी:
रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 25 जुलै रोजी पहाटे पाच वाजताचे सुमारास हिंदू स्मशानभूमी ते रेल्वे स्टेशन रोडवर घडली.
 
प्राप्त माहितीनुसार फरीद कॉलनी मोर्शी येथील शबाना परवीन सईदशहा (42) ही महिला आपल्या पतीसोबत अकोला येथे सकाळी 5:45 वाजता मोर्शी येथून असलेल्या काचीगुडा रेल्वेने जाण्यासाठी आपल्या हिरोहोंडा स्प्लेंडर दुचाकीने रेल्वे स्टेशनकडे जात होती. परंतू दरम्यान स्मशानभूमी ते रेल्वे स्टेशन रोडच्या मध्यभागी असलेल्या डांबरी स्पीड बेकर्सवरून दुचाकी उसळली आणि सदर महिला खाली फेकल्या गेल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर मार बसला. लगेच तिला मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.
 
उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यानी प्रथमोउपचारानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून अमरावती नेण्याचा सल्ला देण्यात आला. लगेच या महिलेला अमरावती येथे नेण्यात येऊन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान सदर महिलेचे मृत्यू झाला. अमरावती येथे महिलेच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिच्या पार्थिवावर मोर्शी येथे अंतिम संस्कार पार पडला. स्मशानभूमी ते रेल्वे स्टेशन रोडवर मोठे डांबरी स्पीड ब्रेकर्स उभारण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी टू व्हीलर वाहनाचा अपघात घडल्याचे महिलेचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.