पैश्याच्या व्यवहारातून महिलेला केले ब्लॅकमेल

    26-Jul-2024
Total Views |
- नग्न फोटो आणि व्हिडिओ काढून पतीला पाठवण्याची धमकी

Threatening woman (Image Source : Internet/ Representative) 
अमरावती:
पतीच्या ओळखीच्या व्यक्तीला दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना चांदूरबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 4 फेब्रुवारी 2024 रोजी घडली. याप्रकरणी महिलेने 24 जुलै रोजी चांदूर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी रितेश भास्कर वानखडे (32, रा. बर्हाणपूर, चांदूर बाजार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या 30 वर्षीय महिलेच्या पतीने आरोपी रितेश वानखडे याला 500 रुपये उधार दिले होते. मात्र अनेक दिवसांपासून तो पैसे परत करत नव्हता. त्यामुळे ती महिला पैसे मागण्यासाठी रितेशकडे गेली. त्यावेळी त्याने तिचा हात धरून तिला घरात ओढले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, त्याने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून पतीला पाठवण्याची धमकी दिली. त्यानंतरही आरोपीने विवाहितेची बदनामी करण्याची धमकी देऊन तिला भेटण्यास सांगून लैंगिक अत्याचार केला. बदनामीच्या भीतीने महिलेने आरोपींबाबत अद्याप तक्रार केली नव्हती. मात्र पतीला सर्व काही सांगितल्यानंतर तिने 24 जुलै रोजी चांदूर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी रितेश वानखडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.