कुटूंब गेले ओकारेश्वरला, चोरट्याने धूतले घर

    26-Jul-2024
Total Views |
-अचलपूरच्या सुखकर्ता अपार्टमेंट मधील घटना

thieves
 (Image Source : Internet/ Representative)
अमरावती:
ओंकारेश्वरला देवदर्शनाकरिता गेलेल्या कुटूंबाचे चोरट्याने घर धूवून काढत 6 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना 24 जुलै च्या रात्री घडली, याप्रकरणी 25 जुलै रोजी पोलिसात तक्रार करण्यात आली.
 
अशोक अमृतराव ठाकरे(वय 65, रा.देवमाळी) याचा मुलगा हा परतवाडा ते अमरावती मार्गावरील सुखकर्ता अपार्टमेंट येथे राहतो. घटनेच्यावेळी त्याचे कुटूंब ओंकारेश्वर येथे दर्शनाकरिता गेले होते. याच संधीचा फायदा घेत, अज्ञात चोरट्या घरफोडी करुन 42 ग्रॅमचे मंगळसुत्र, 18 ग्रॅमचे मिनी मंगळसुत्र, 30 ग्रॅमच्या सोन्याच्या बांगळ्या, नगदी 75 हजार रुपये, लॅपटॉप असा एकुण 5 ते 6 लाखांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.