काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    26-Jul-2024
Total Views |
Sunil Kedar
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
 
या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत अपिलवर निर्णय करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहे. केदार यांचे वकील सुप्रीम कोर्टात उपस्थित नसल्याने हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले होते. त्यात वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या विनंतीवरून हे प्रकरण पुढे ढकलले आहे. मात्र त्यामुळे सुनील केदार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
 
दरम्यान नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे सुनील केदार हे आमदार म्हणून अपात्रच राहतील, असा निर्णय देण्यात आला होता. त्यांनंतर स्वतः ला मिळालेली शिक्षा स्थगित करून घेण्यासाठी आणि त्या आधारे आमदारकी बहाल करून घेण्यासाठी आता सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. परिणामी त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी प्रक्रिया पार पडली.