नागपूरसह देशभरात कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना आभिवादन

26 Jul 2024 18:23:50
Kargil Victory Day
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
भारतीय जवानांनी शौर्य गाजवत 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानला धुळ चारली. कारगिल युद्धातील या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. नागपूरसह देशभरात कारगिल युद्धातील जवानांना अभिवादन करण्यात आले.
 
कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९९९ साली झाले होते. कारगिल सेक्टरमध्ये आलेल्या घुसखोरांना सीमेपार करण्यासाठी हे युद्ध झाले होते. हे युद्ध प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ १९९९ साली मे ते जूलै या महिन्यांमध्ये झाले.
 
दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य यांना शोधून काढण्यासाठी प्रथमच हवाई दलाचा वापर करण्यात आला. कारगिल युद्ध हे समुद्रसपाटीपासून अत्यंत उंच प्रदेशात लढले गेल्याने असे युद्ध लढण्यासाठी अत्यंत अवघड समजले जाते. ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १४ जुलै रोजी जाहीर केले. २६ जुलै रोजी ऑपरेशन विजय अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर करण्यात आले. या युद्धात भारताच्या ५०० लोकांना हौतात्म्य आले.
Powered By Sangraha 9.0