कडधान्य खरेदीसाठी ई-समृद्धी पोर्टलवर नोंदणी करा

26 Jul 2024 21:58:24
 
pulses
 (Image Source : Internet/ Representative)
अमरावती:
आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेडमार्फत मका, तुर, चना, मुग, उडिद व सोयाबीन खरेदी केली जाते. शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी ई-समृद्धी पोर्टल सुरु केले आहे. शेतकऱ्यांनी नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेणेसाठी ई-समृध्दी पोर्टलवर नाव नोंदणी करुन आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन सहकारी पणन महासंघामार्फत करण्यात येत आहे.
 
हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तूर, चना, उडिद व सोयाबिन खरेदी करण्यात येणार आहे. नाफेडमार्फत राबविण्यात येणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा व शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी ई-समृद्धी पोर्टल सुरु केले आहे. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी https://esamridhi.in#/login या संकेतस्थळाला भेट देवून आपल्या शेतमालाची एमएसपी दराने विक्री करण्यासाठी पोर्टलवर खरेदी प्री-रजिस्ट्रेशन करावे. पोर्टलवर नोंदणी करतांना अडचणी आल्यास अथवा अधिक माहितीतीसाठी जिल्हा पणन अधिकारी यांच्या भ्रमणध्वनी क्रं. 7391994693, तसेच कार्यालयाचे प्रतिनिधी स्वप्नील ढोले 9960546415 यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा.
Powered By Sangraha 9.0