रोटरी क्लब ऑफ बल्लारपूरचा पदग्रहण सोहळा

26 Jul 2024 21:10:06
 
Ballarpur
बल्लारपुर:
रोटरी क्लब ऑफ बल्लारपूरचा पदग्रहण सोहळा हॉटेल स्केवेअर पाईंट हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उप प्रांतपाल श्रीकांत रेशिमवाले उपस्थित होते. पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लबच्या मावळत्या अध्यक्ष राहुल वरु यांनी नवीन अध्यक्ष प्रशांत दोन्तुलवार यांना कॉलर घालून रोटरी क्लबचा पदभार सोपविला.
 
रोटरी क्लब ऑफ बल्लारपूरचा नवीन कार्यकारणीत सचिव उत्तम पटेल, सह सचिव नीलेश चीमद्यालवार, रोखपाल मनीष मुलचंदानी, निदेशक कल्पेश पटेल,सुरेश कुकरेजा,महेश कायरकर ,राजू मुंदडा,उमेश पटेल,अनुप गांगशेटीवार यांची नेमणूक करण्यात आली. या प्रसंगी नवीन अध्यक्ष प्रशांत दोन्तुलवार यांनी आपल्या मनोगतातून वर्षभर करण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली. कार्यक्रमाला निखील गुजरकर, राहुल वरु,राजू पटेल, प्रफुल चरपे, विक्रांत पंडित,सचिन तल्हार,अखिल निखारे, शैलेश झाडे, डॉ प्रशिक वाघमारे,अजय वासालवर आदी सदस्य उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0