जयदीप कवाडेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिली अनोखी भेट

26 Jul 2024 20:27:40
- स्वत: पेन्सिल पोर्ट्रेटचे स्केच तयार करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Jaideep Kawade gifted pencil sketch to DCM Devendra Fadnavis 

एबी न्यूज नेटवर्क :
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राला अग्रस्थानी नेऊन विकासाभिमूख कार्य करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 54 वाढदिवसानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी अनोखी भेट दिली. पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी स्वत: पेन्सिल पोर्ट्रेटचे स्केच तयार करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
 
यावेळी जयदीप कवाडे म्हणाले की, अभ्यासू, स्वच्छ प्रतिमा, उत्तम संसदपटू, विदर्भवादी आताचे महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस हे नागपुरचे विकास पुरूष म्हणून त्यांची ओळख आहे. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असा यशाचा टप्पा देवेंद्र फडणवीस यांनी गाठले आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवासचे औचित्य साधून जयदीप कवाडे यांनी स्वत: 15 दिवस हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच तयार केले. स्केचमध्ये जयदीप कवाडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सुंदर चित्र तयार केले. या स्केचमध्ये "आदरणीय देवेंद्र जी…शत: आयुष्य व्हा" असे हृदयस्पर्शी स्लोगन देत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
 
जयदीप कवाडे यांना राजकारणापलीकडे त्यांचा चित्र काढण्याचा छंद आहे. हा छंद जोपासून जयदीप कवाडे आपल्या आपुलकीच्या माणसांना पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढून भेट देतात. महायुतीचे मुख्य नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात पीपल्स रिपब्लिकन पार्टी त्यांच्यासोबत प्रामाणिक पणे घटक पक्ष म्हणून सोबत आहे.
Powered By Sangraha 9.0