माजी आमदार रमेश कुथे यांनी पुन्हा बांधले शिवबंधन

26 Jul 2024 16:19:56
Former MLA Ramesh Kuthe joins UBT
(Image Source : tw/@ShivSenaUBT_)
 
एबी न्यूज नेटवर्क :
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून गोंदिया विधानसभेतील माजी आमदार रमेश कुथे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे.
 
याप्रंसगी माजी जिल्हा प्रमुख राजकुमार कुथे, शेखर वाढवे, गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव, शैलेश जयस्वाल, पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हा संपर्कप्रमुख बाबा ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख नरेश माळवे यांनी देखील पक्षप्रवेश केला.
 
 
वर्ष 2019 मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता सहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी मुंबईत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर त्यांचा पक्षप्रवेश झाला.
Powered By Sangraha 9.0