भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या; पंकजा मुंडेंच्या वाढदिवशी समर्थकांनी लावलेल्या बॅनरची चर्चा

26 Jul 2024 19:01:00
Pankaja Munde
 (Image Source : Internet)
 
बीड :
भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा आज 26 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने सर्व स्तरावर त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. 'भावी मुख्यमंत्री संघर्ष कन्या’असा उल्लेख केल्याचे अनेक बॅनर बुलढाणा येथे झळकले आहेत.
 
पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी बुलढाण्यात कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे. विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पंकजा मुंडे या 29 तारखेला बीड जिल्ह्यात दाखल होणार आहेत. भगवानभक्ती गडावरून पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Powered By Sangraha 9.0