(Image Source : Internet)
नागपूर :
योगी परमपूज्य सद्गुरू श्री नानामहाराज तराणेकर यांच्या अखिल भारतीय त्रिपदी परिवारातील शिष्य व अनुग्रहित भाविकांनी श्री गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत उल्हास व भक्तीभावाने साजरा केला. शिवाजी नगर येथील 'चैतन्य पीठ' ह्या उपासनास्थानी असलेल्या श्रींच्या पादुकावर अभिषेक करण्यात आला व त्यानंतर सामुहिक घोरकष्टंउद्धरण स्तोत्र पठण करण्यात आले.
संध्याकाळच्या सत्रात करुणा त्रिपदी व स्वराभिषेक ह्या संस्थेद्वारे सुमधूर भक्ती संगीताचा कार्यक्रम सादर झाला. कार्यक्रमाची संकल्पना सचिन व रुपाली बक्षी यांची होती. निवेदक, सह गायक व वादक ह्यांनी उत्कृष्ट साथसंगत केल्यामुळे कार्यक्रम बहारदार झाला. नागपूर शाखा प्रमुख राजीव हिंगवे यांनी सर्व कलाकारांचे स्वागत केले. शिवाजी नगर सभागृह भाविकांच्या उपस्थितीने तुडुंब भरले होते. आरती व प्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता झाली.