बगाजी सागर धरणाचे 3 दरवाजे 30 सेमी उघडले

26 Jul 2024 00:03:29
 
Bagaji Sagar Dam
 
धामणगाव रेल्वे :
धामणगाव रेल्वे तालुक्यात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नद्यांचा जलस्तर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे वरुड बगाजी येथील धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून 30 सेमी उघडून एकूण विसर्ग 77.87 घ.मी.प्र.से पाण्याचा विसर्ग होत आहे.
 
तालुक्यात पावसाची हजेरी सुरूच आहे. सोबतच पावसाने चांगलाच जोर धरला आहे, त्यामुळे पाणी ओसंडून वाहत आहे. तालुक्यातील वरुड बगाजी गावानजीकच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या वरुड बगाजी धरणाची निम्न वर्धा प्रकल्पाच्या बगाजी सागर धरणात पाणी पातळी 282.50 मी. झाली असून पाणीसाठा 65.61 टक्के झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता निम्न वर्धा प्रकल्पाचे 3 दरवाजे 30 से.मी. उघडुन एकूण विसर्ग 77.87 घ.मी.प्र.से प्रमाणे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती निम्न वर्धा प्रकल्प उपविभागाचे धनोडी येथील उपविभागीय अभियंता पवन पांढरे यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0