डॉ. सुनील देशमुख यांच्या युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

26 Jul 2024 23:10:17
- अमरावती विधानसभा यु.काँ.च्या विविध पदांवर नियुक्ती

Congress  
अमरावती:
काँग्रेस पक्षाचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन व विकास पुरुष डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने काल युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
 
राहुल नगर परिसरातील युवकांनी सागर वानखडे यांचे नेतृत्वात डॉ. सुनील देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय येथे प्रवेश घेतला. यावेळी सागर वानखडे यांची अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या कामगार सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जमील कॉलनी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ऍड. अफरोज खान पठाण यांचा देखील प्रवेश पार पडला. अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे अमरावती विधानसभा युवक काँग्रेसच्या सचिव पदी कार्यरत असणाऱ्या आकाश धुराटकर यांना नवीन जबाबदारी देत त्यांची युवक काँग्रेसच्या ब्लॉक क्रमांक तीन च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना डॉ.सुनील देशमुख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी माजी महापौर अशोक डोंगरे, माजी स्थायी समिती सभापती भालचंद्र घोंगडे, पप्पू पडोळे, नितीन देशमुख, विनोद मोदी, औद्योगिक सेल अध्यक्ष समीर जवंजाळ, शशिकांत बोंडे, निर्मल अहरवार, राहुल तायडे, सोमेश्वर मुंजाळे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव योगेश बुंदेले, अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख यांच्यासह इतर मान्यवर व युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0