चोरट्यांनी तोडले ३ ठिकाणचे कुलूप; ॲक्टिवा चोरली

25 Jul 2024 23:51:47
 
Activa stolen
 (Image Source : Internet/ Representative)
रामटेक:
चोरट्यांनी मंगळवारी २३ जुलैच्या रात्री तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. किसान चौकातील ॲड. संजीव खंडेलवाल यांच्या घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यांना माल मिळाला नाही. चोरानी त्यांची घरी ठेवलेली ॲक्टिवा घेऊन पसार झाले. घटनेच्या वेळी खंडेलवाल हे बाहेरगावी गेले होते.
 
दुसऱ्या घटनेत किसान चौकातील इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते संजय जैन यांच्या शटरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुलूप तुटले नाही. तिसऱ्या ठिकाणी किट्स कॉलेजजवळील रवी पडोळे यांच्या पान स्टॉलचे कुलूप तोडून एक हजार रुपयांची नाणी चोरून नेली. याप्रकरणी रामटेक पोलीस तपास करत आहेत. पोलीस तपासादरम्यान तीन आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. रात्री २.३० च्या सुमारास ट्रिपल सिट मोटारसायकलवर चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसतात.
Powered By Sangraha 9.0