ब्रम्हपुरी :
भारतीय जनता पार्टी, ब्रह्मपुरी विधानसभा आयोजित भाजपाचे लोकप्रिय नेते, माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबीर २६ जुलै २०२४ ला नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय सभागृह, ब्रह्मपुरी येथे शिबिरामध्ये होणाऱ्या मोफत तपासणी हृदयरोग तपासणी, छातीरोग तपासणी,मुत्रपिंड व मुतखडा,कर्करोग तपासणी, जनरल सर्जरी, जनरल मेडिसिन, अस्थी रोग (हड्डी रोग), हिप जॉईंट व ई सी जी केली जाणार आहे. शिबिरामध्ये रोगाचे निदान झाल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यामध्ये विशेष सहकार्य डॉ. गिरीषजी चरडे, भाजपा वैद्यकीय आघाडी विदर्भ, शंकरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर, आशा हॉस्पिटल कामठी, माधव नेत्रालय - नागपूर, शासकीय दंत महाविद्यालय - नागपूर करणार आहेत. तसेच 27 जुलै 2024 ला दुपारी 1:30 वाजता कार्यकर्ता महामेळावा आयोजित करण्यात आले आहे. मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हरिषभैया शर्मा जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर ग्रामीण, सुधिर मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा तथा वन व सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, माजी खासदार अशोकभाऊ नेते, उत्सवमूर्ती प्रा. अतुल देशकर माजी आमदार, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र उपस्थित राहणार आहेत. सर्व कार्यकर्ता बंधू व भगिनी आपण होणाऱ्या 'महामेळाव्यात' व मोफत महाआरोग्य शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य अरूण शेंडे तालुका अध्यक्ष भाजपा ब्रम्हपुरी, इंजि. अरविंद नंदुरकर शहर अध्यक्ष भाजपा ब्रम्हपुरी,राजु पाटील बोरकर तालुकाध्यक्ष भा जपार्टी, सिंदेवाही, अविनाश पाल तालुका अध्यक्ष भाजपा सावली यानी केले आहे.