भाजपच्या 'या' दोन खासदारांची खासदारकी धोक्यात

25 Jul 2024 16:23:36

BJPs Kangana Ranaut and Shankar Lalwani in danger
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
सार्वत्रिक निवडणुकीत "अबकी बार चारसो पार' ची मनीषा बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत धक्का बसला असला तरी मात्र, भाजपने एनडीए सह सरकार स्थापन केले आहे. पण आता भाजपच्या दोन खासदारांची खासदारकी धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप नेत्या खासदार कंगना राणावत आणि मध्य प्रदेशातील इंदूरमधून खासदार म्हणून निवडून आलेले भाजप नेते शंकर लालवानी या दोघांच्या खासदारकी विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा आणि मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा जागेबाबत दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही जागांच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0