अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात

24 Jul 2024 17:28:25
- बाजारातून करायचा मोबाईल लंपास, 20 फोन जप्त

Thief arrested 
नागपूर :
घरफोडी आणि बाजारातून मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली. चेतन उर्फ बौना नंदकुमार पाल (28) रा. कामनानगर, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 20 मोबाईल फोन जप्त केले आहेत.
गत 2 जुलै रोजी कळमना वस्तीत राहणाऱ्या सलमा हुसेन खान (47) यांच्या घरी चोरी झाली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. खबऱ्यांना कामावर लावण्यात आले.
 
गुप्त माहितीवरून पोलिसांनी चेतनला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सलमा यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले. त्याला अटक करून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला. त्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना वेगवेगळ्या कंपन्यांचे 20 मोबाईल फोनही मिळाले. त्याची सखोल चौकशी केली असता, तो वेगवेगळ्या आठवडी बाजारांत जाऊन गर्दीमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या लोकांचे मोबाईल फोन लंपास करीत असल्याचे समजले. चेतनविरुद्ध इतरही गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई पोनि गोकुल महाजन, सपोनि उज्ज्वल इंगोले, सफौ गंगाधर मुटकुरे, पोहवा विशाल अंकलवार, विशाल भैसारे, यशवंत अमृते, ललित शेंडे आणि वसीम देसाई यांनी केली.
Powered By Sangraha 9.0