(Image Source : Internet)
मुंबई :
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. यातच मात्र अशातच आता अजितदादा गटाच्या आमदाराच्या मुलाने थेट आपल्या वडिलांविरोधात निवडणूक लढणार असल्या सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ यांनी आपल्या वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याबाबत वक्तव्य केले आहे. मी छाती फाडली तर शरद पवार दिसतील असं वक्तव्य गोकुळ झिरवळ यांनी केले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या शरदचंद्र पवार गटाच्या नाशिक येथील मेळाव्याला गोकुळ झिरवळ उपस्थित होते.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत गोकुळ झिरवळ हे दिंडोरी मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. याचपार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ याच मतदारसंघातून निडवणूक लढणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.