रॉकीने हिना खानला नेले शॉपिंगसाठी; प्रियकराला म्हणाली 'माझी ताकद'

24 Jul 2024 19:00:49
Hina Khan
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) काही दिवसांपूर्वी तिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. ती कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात असून तिने स्वतः याबाबत सोशल मीडियावर याबाबत सांगितले होते. या कठीण काळात तिला तिचे कुटुंबीय आणि चाहत्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळत असून हिना देखील भक्कमपणे या संकटाचा सामना करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत तिचा प्रियकर रॉकी जयस्वाल देखील ठामपणे हिनाच्या पाठीशी उभा आहे. तिला बरे वाटावे यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. हा कपल नुकताच शॉपिंगसाठी मॉलमध्ये गेला असून त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
हिना खान आणि रॉकी जयस्वाल अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ही जोडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत जेव्हा हिना खानला कळले की तिला कॅन्सर झाला आहे, तेव्हा तिचा आत्मविश्वास कुठेही कमी होऊ याने यासाठी रॉकी दररोज काहीतरी करत असतो. कधी रॉकी हिनासाठी खास पदार्थ बनवतो तर कधी तिला शॉपिंगला नेतो. हिनाने रॉकीच्या प्रयत्नांबद्दल त्याचे आभार मानले आहेत आणि त्याला तिची ताकद म्हटले आहे.
 
Hina Khan
  (Image Source : Internet)
 
म्हणाली 'रॉकी माझी ताकद'
 
हिनाने काही तासांपूर्वी तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती आणि रॉकी मिरर सेल्फी घेताना दिसत आहेत. हा फोटो कुठल्यातरी कपड्याच्या दुकानाचा आहे, ज्यावरून हे गोंडस जोडपे खरेदीसाठी बाहेर गेले होते. दोघांनीही काळ्या रंगाचे ट्विनिंग केले या स्टोरीमध्ये हिना खानने रॉकीला टॅग करत लिहिले की, तू सर्वोत्कृष्ट आहेस. अल्लाह तुला नेहमी आशीर्वाद देवो. तुम्ही माझी ताकद आहे.
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिना खानने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये करून कँसर झाल्याची माहिती दिली होती. तिला आपल्या पोस्ट मध्ये लिहिले होते की, 'सर्वांना नमस्कार, जे लोक माझ्यावर प्रेम करतात आणि काळजी घेतात. त्यांच्यासाठी मी एक बातमी शेअर करणार आहे. मला स्टेज 3 चा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. हे माझ्या आयुष्यातील पुढचे आव्हान आहे.' यानंतर हिनावर उपचार सुरू झाले असून तिला तिच्या केमोथेरपीचा पहिला डोस मिळाला आहे.
Powered By Sangraha 9.0