'शहरात खड्डे की खड्ड्यात शहर' नागपूरकरांना भोगावा लागतोय भाजपैयाच्या विकासाचा कहर

24 Jul 2024 16:55:25
 
BJP
 
नागपूर :
उत्तर नागपूर आणि मध्य नागपूरला जोडणारा मुख्य रस्ता बोरियापुरे पासून कडबी चौकपर्यंतचा 2 किलोमीटरचा रस्ता खराब आहे. त्यामुळे मंगळवारी राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महासचिव व मनपा नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात पहलवान बाबा दरगाह चौक येथे आंदोलन करण्यात आले.
 
गेल्या 4 वर्षा पासून येथे मेट्रो पुलाचे काम चालू आहे. त्यामुळे पहलवान बाबा दरागाह चौकच्या समोरील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी खड्ड्यात एक बाईकस्वार परिवार पडून लहान बाळास गंभीर दुखापत झाली, यानंतर त्याला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. याचप्रमाणे येथे दररोज अपघात होत आहे. हा रोड बनवण्याबाबत विचारणा केल्यास मेट्रो पुलाचे काम पूर्ण झाल्यावर रोड बनवण्यात येईल, अशी उत्तरे अधिकारी देतात. त्यामुळे महानगर पालिका, पीडब्ल्यूडी आणि मेट्रोचे झोपलेले प्रशासन कोणाचा नाहक बळी गेल्याशिवाय जागे होणार नाही, आसे वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर मेट्रो पूल व रोडचे काम पूर्ण न झाल्यास रोडची वाहतूक बंद करून चक्का जाम करू, असा बंटी शेळके यांनी महानगरपालिका, मेट्रो व पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना आंदोलन करून शेवटचा इशारा दिला. यावेळी आंदोलनात मोईझ शेख, सलीम शाह, आकाश गुजर, श्रीकांत ढोलके, सागर चव्हाण, प्रफुल इझनकर, अमन लुटे, राजू अन्सारी,कुणाल खडगी आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0