भाजप नेते दरेकरांनी कपाळावर कुंकू लावले तर सखू सारखे दिसतील; जरांगे पाटलांनी डिवचले

24 Jul 2024 17:35:08
Jarange patil criticized pravin darekar
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु आहेत. आज पत्रकार परिषदेत बोलतांना जरांगे पाटलांनी प्रवीण दरेकर यांच्यावर पातळी सोडून टीका केली.
 
दरेकरने कपाळावर कुंकू लावले तर, अतिशय सुंदर दिसेल, सखू सारखा दिसेल,असे म्हटले आहे. तसेच राज्य सरकारकडून कुणीच आले नाही. सरकारकडे मंत्री उरले नाहीत.अनेक जण आले, आता पुन्हा कोणत्या तोंडाने जायचे हा विषय असेल. समाजाच्या दबावामुळे मी सलाईन घेतले, अशी माहितीही त्यांनी दिली.
 
दरम्यान मनोज जरांगे यांनी 20 जुलैपासून जालन्यातील अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.आज या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. मात्र, त्यांनी आज उपोषण स्थगित केल्याची घोषणा करत राज्य सरकारला आता 13 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे.
Powered By Sangraha 9.0