नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

24 Jul 2024 19:01:07

Farmer at Mindala in Nagbhid died in tiger attack
(Image Source : Internet/ Representative)
 
चंद्रपूर :
नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्य झाल्याची माहिती समोर येत आहे.
 
ही घटना मंगळवार, 23 जुलै रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. दोडकू शेंदरे (60) असे मृताचे नाव आहे. माहितीनुसार, दोडकू शेंदरे हे नित्यनियमाप्रमाणे शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते. कोसंबी गवळी-वासला मक्ता रोडवर त्यांचे शेत आहे.
 
सायंकाळी घरी परतत असताना वाघाने अचानक दोडकूवर हल्ला केला. वाघाने त्यांना काही अंतरापर्यंत ओढले. इतर शेतकऱ्यांना दोडकू शेंदरे शेतात न दिसल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यांना काही अंतरावर एक वाघ आणि एक मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. लोकांनी या घटनेची माहिती वनविभाग आणि पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलीस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी घटनेची नोंद घेतली.
Powered By Sangraha 9.0