Union Budget 2024-25 : अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? पहा संपूर्ण यादी

23 Jul 2024 14:10:23

Union Budget 2024 25
 
 
नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प (Union Budget 2024 25) सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असून यात सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, रोजगार, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, नवोपक्रम, संशोधन आणि विकास आणि पुढील पिढीतील सुधारणा यावर भर देण्यात आला आहे. अशातच सर्वसामान्य नागरिकांसाठी काही गोष्टी स्वस्त झाल्या तर काही महागल्या आहेत. पाहूया याची संपूर्ण यादी...
 
 
 
 
अर्थसंकल्पात या गोष्टी झाल्या स्वस्त
सोने-चांदी स्वस्त
प्लॅटिनमवर कस्टम ड्युटी कमी
कर्करोग औषधे
मोबाईल, चार्जर
मासोळ्यांचे अन्न (Fish Food)
देशात बनवले जाणाऱ्या चामड्याच्या वस्तू, कापड आणि शूज
पीव्हीसी फ्लेक्स बॅनर
एक्सरे ट्यूबवर सवलत
 
या गोष्टी महागल्या
प्लास्टिकच्या वस्तूंवर आयात शुल्कात वाढ
पेट्रोकेमिकल - अमोनियम नायट्रेटवर कस्टम ड्युटी वाढली
पीव्हीसी - आयात कमी करण्यासाठी 10 ते 25 टक्के वाढ
हवाई प्रवास महाग
सिगारेट
Powered By Sangraha 9.0