Union Budget 2024-25: अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी युवा वर्गासाठी मोठी घोषणा

23 Jul 2024 13:32:19

Nirmala Sitharaman
 (Image Source : X)
 
नवी दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. याशिवाय अर्थमंत्र्यांनी अनेक विविध क्षेत्रासाठी वाढीव तरतूद देखील जाहीर केली. तसेच रोजगार निर्मितीसाठी अनेक योजनांची घोषणा केली आहे.
 
अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी युवा वर्गासाठीही मोठी घोषणा केली आहे. देशातील टॉप कंपन्यांमध्ये युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यातून दर महिना युवकांना ५ हजार रुपये मासिक भत्ता दिला जाईल. हा मासिक भत्ता पंतप्रधान इंटर्नशिप योजनेतंर्गत १२ महिन्यांपर्यंत असेल. युवकांना १२ महिने कंपन्यात इंटर्नशिप मिळेल. पुढील ५ वर्षात देशातील टॉप कंपन्यांमध्ये १ कोटी युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0