ट्रेलरमध्ये दुचाकी अडकली; अल्पवयीन मुलांना नेले फरफटत

23 Jul 2024 14:27:51
 
Accident
 
छत्तीसगड :
कबीरधाम जिल्ह्यात ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. कुकडूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील पोलमी गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही मृत तरुण दुचाकीवरून त्यांच्या घरी येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जगतू मरावी (वय १४ वर्षे) आणि छोटू उर्फ छोटे लाल (वय १५ वर्षे) असे मृत मुलांचे नाव आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कुकडूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रेलरमध्ये दुचाकी अडकल्यामुळे दुचाकी ३०० मीटरपर्यंत फरफटत नेली. तर अपघातानंतर ट्रेलर चालकाने वाहन सोडून पळ काढला. यामध्ये दोन्ही तरुण गंभीर झाल्यामुळे दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0