'मनरेगा'अंतर्गत शेतात बांबू लागवडीसाठी अनुदान

23 Jul 2024 18:00:36
Subsidy for cultivation of bamboo
(Image Source : Internet/ Representative) 
अकोला :
'मनरेगा' अंतर्गत शेतात बांबू लागवडीस अनुदान देय असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. योजनेत सलग लागवड व बांधावर लागवडीसाठी प्रतिहेक्टरी मापदंडानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांना अनुदान देय आहे.
 
जमीन तयार करणे, खड्डे भरणे, रोपलागवड, पीक संरक्षण, नांग्या भरणे, पाणी देणे आदी कामांवर 100 टक्के अनुदान देय असून, प्रतिहेक्टरी कमाल अनुदान मर्यादेनुसार रक्कम लाभार्थ्याला चार वर्षांच्या कालावधीत दिली जाणार आहे.
 
शेतकरी बांधवांनी ग्रामपंचायत किंवा कृषी सहायक यांच्याकडे आवश्यक दस्तऐवजासह अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुंभार, तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0