शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रसचे आता ‘मिशन विधानसभा’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लागले कामाला

23 Jul 2024 18:34:13

NCP Sharad Pawar group on Mission Assembly Elections
 
 
नाशिक :
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षानेही तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळ्वारी औरंगाबाद रोडवरील जेजुरकर मळयातील जय शंकर फेस्टिव्हल लॉन्समध्ये जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडत आहे. या मेळावा झाल्यानंतर जयंत पाटील पंधराही विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
 
पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर -
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. यादरम्यान जयंत पाटील पंधराही विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
 
विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी क्रमवारी ठरवली असून नाशिक पूर्व विधानसभेतील पदाधिकाऱ्यांसमवेत प्रदेशाध्यक्ष पाटील चर्चा करतील. त्यानंतर नाशिक पश्चिम, मध्य, देवळाली, सिन्नर, दिंडोरी-पेठ, कळ्वण-सुरगाणा, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, नांदगाव, येवला, बागलाण, चांदवड-देवळा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, निफाड या मतदारसंघांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. मेळाव्यास प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्त्तात्रय पाटील, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड आदींसह जिल्हयातील सर्व तालुकाध्यक्ष, कार्यध्यक्ष, शहरातील विभागीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, युवक तालुकाध्यक्ष, महिला अध्यक्ष, कार्याध्यक्ष आदींसह पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Powered By Sangraha 9.0