मटकाझरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

23 Jul 2024 21:37:34
 
Matkazari ZP School
 
वाडी :
फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत मटकाझरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीच्या चार विद्यार्थी खुशी संदीप कंगाले, पल्लवी ईश्वर टेकाम, अंजली बालाराम वरठी, सम्यक कैलास खैरकर व इयत्ता आठवीचा विद्यार्थी वीर रामुजी धुर्वे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झाले आहे. त्यातील इयत्ता आठवीचा वीर हा शिष्यवृत्ती धारक झालेला आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक कैलाश डफ, नमिता सोनकुसरे, शिक्षिका प्रणाली कोल्हे, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी व समस्त गावकरी मंडळांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0