कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर यांना मोक्का कायद्यान्वये अटक

23 Jul 2024 13:37:38
 
Criminal Sumit Thakur
 (Image Source : Internet)
नागपूर :
कुख्यात गुन्हेगार सुमित ठाकूर याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमित ठाकूरला मोक्का कोर्टात हजर केले असता त्याला २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कालावधीत सुमितकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची पोलिसांनी अपेक्षा व्यक्त केली.
 
हेही वाचा : धक्कादाक! नागपुरात रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा मुतदेह आढळला, हत्येचा अंदाज 
 
सुमित गेल्या नऊ महिन्यांपासून शहरातून फरार झाला होता नुकतेच, तो शहरात मोठ्या गुन्हेगारी कारवायाची योजना आखत असल्याचे पोलिसांना कळाले. 17 जुलै रोजी, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली. यापूर्वी गणेश चाचेरकर उर्फ गुई याने केलेल्या खंडणीच्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली होती.
 
तो २० जुलैपर्यंत कोठडीत होता. मात्र, गिट्टीखदान पोलिस त्याच्या कोठडीत वाढ करू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. सुमित व त्याच्या साथीदारांविरुद्ध जरीपटका येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी मोक्का कारवाईही करण्यात आली.आता या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला 26 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0