केंद्र सरकारने अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काहीच दिले नाही त्याचा फटका विधानसभेत बसेल; ठाकरे गटाचा दावा

23 Jul 2024 17:55:27
Central Government Gave Nothing to Maharashtra in Budget
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काही मिळाले नाही. याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा मोठा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
 
नाशिकचे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. अर्थसंकल्प पाहिला तर महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही. शेतकऱ्यांनाही या अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांना जास्त फायदा झालेला दिसत आहे. एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आधी होता, त्यामुळे त्यांना काहीच दिले नाही असे वाटते. ज्यांच्यामुळे सरकार आहे, त्यांना जास्त लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अपेक्षा होत्या. याचा परिणाम पुढील विधानसभा निवडणुकीत दिसेल, असा इशारा राजाभाऊ वाजे यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0