भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार गोलरक्षक पीआर श्रीजेश यांची मोठी घोषणा

23 Jul 2024 15:20:34
 
PR Sreejesh
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा अत्यंत महत्त्वाचा सदस्य आणि संघाचा माजी कर्णधार गोलरक्षक पीआर श्रीजेश याने मोठी घोषणा केली आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकनंतर त्याने निवृत्तीची घोषणा सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.
 
पीआर श्रीजेश हा केवळ भारताचाच नव्हे तर जगातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक मानला जातो. संघाला त्याची गरज असेल. या ऑलिम्पिकमध्ये पीआर श्रीजेश ला पदक मिळवून देण्यासाठी हॉकी प्रेमी 'विन इट फॉर श्रीजेश' ही मोहीम राबवत आहेत.
 
हेही वाचा : पॅरिस ऑलिम्पिक 2024 : भारताच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन
 
त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “माझे सहकारी कठीण काळात आणि चांगल्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आम्हाला पॅरिसमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करायची आहे आणि यावेळी आम्हाला आमच्या पदकांचा रंग बदलायचा आहे.”
 
ज्येष्ठ हॉकी गोलरक्षक श्रीजेशला ३२८ आंतरराष्ट्रीय सामने, तीन ऑलिम्पिक खेळ, राष्ट्रकुल खेळ आणि विश्वचषक खेळण्याचा अनुभव आहे. यावेळी तो चौथा ऑलिम्पिक खेळणार आहे. 2010 च्या विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केल्यानंतर, श्रीजेशने भारतासाठी अनेक संस्मरणीय विजय मिळवले आहेत.
Powered By Sangraha 9.0