थायलंड येथील मूर्ती कोंढाळीतील बुद्ध विहारास भेट

22 Jul 2024 17:50:09
Visit to the Buddhist Monastery in Kondhali Thailand
 (Image Source : Internet)
 
कोंढाळी :
गुरुपौर्णिमेनिमित्त व वर्षावासा प्रारंभी हा दुहेरी संयोग या पावण दिनाचे महत्व जाणून हल्ली काटोल येथे वास्तव्यास असलेले निवृत्त मुख्याध्यापक नत्थुजी मोतीराम भाजीखाये यांनी रविवारी कोंढाळी येथील ज्ञानज्योती बुद्ध विहारास थायलंड येथील अष्टधातुची बुद्ध मूर्ती भेट दान केली.
 
यावेळी विधीवत पूजा करुन मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी संघमित्रा गेडाम, प्रमोद गेडाम सोबत होते. तर या कार्यक्रमास अध्यक्ष अतुल नारनवरे, हरिदास कोकाटे, रुपराव गोंडाने (सरपंच मासोद), धर्मपाल पाटील, तेजराव गजभिये, सुमेध गोंडाने, अरुणा सोनुले काटोल, मनिषा गजभिये, मैना कोकाटे, विद्याबाई मडके, शालू बोरकर, मंदाबाई सोमकुवर, वनिता नारनवरे, पंचफुला ऊके, सारिका सोमकुवर, प्रिया गजभिये, सुनिता गजभिये, सुलोचना पाटील, देवका ऊके, शांता मेश्राम, नानुबाई, विमल खंडाईत, तुळजा भाजीखाये व मोठ्या संख्येत उपासक उपासिका उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0