धक्कादाक! नागपुरात रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीचा मुतदेह आढळला, हत्येचा अंदाज

22 Jul 2024 16:03:52
Unidentified person body found on railway track
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
यशोधरा नगर पोलीस ठाण्यांतर्गत मांडवा वस्तीजवळील रेल्वे रुळाजवळ अज्ञात व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
नागरिकांना या घटनेसंदर्भात काळातच त्यांनी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला यासंदर्भात कळविले. यानंतर यशोधरा नगर पोलीस पथक आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीचा छिन्नविछिन्न अवस्थेत असेलला मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला.
 
या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. या व्यक्तीच्या गळ्याभोवती दोरीचा तुकडा गुंडाळलेला आढळून आला असून त्याच्या शरीरावर जखमेच्या खुणाही आढळून आल्याने पोलिसांकडून हत्येचा संशय वर्तविण्यात आला.
Powered By Sangraha 9.0