नागपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर; आज शाळा महाविद्यालये राहणार बंद

22 Jul 2024 11:23:31

Orange alert announced in Nagpur district
(Image Source : Internet/ Representative) 
नागपूर :
शहरात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला.
 
आज २२ जुलै २०२४ रोजी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये बंद राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
 
आज पुन्हा पावसाचा धोका पाहता पुन्हा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला असून शाळांनाही तसे कळविण्यात आले आहे. शनिवारी आलेल्या मुसळधार पावसाच्या वेळी उशिरा सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची आणि शाळांची मोठी गैरसोय झाली होती. त्यामुळे खबरदारी म्हणून अगोदरच सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Powered By Sangraha 9.0