केदारनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन; नागपूरच्या एका भाविकासह तिघांचा मृत्यू

22 Jul 2024 13:21:20

Landslide during Kedarnath Yatra
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धाम मार्गावर रविवारी भूस्खलनाची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत नागपूरच्या एका भाविकासह तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
 
किशोर अरुण पराते (रा. नागपूर, महाराष्ट्र), सुनील महादेव काळे (रा. जालना, महाराष्ट्र) आणि अनुराग बिष्ट अशी मृत भाविकांची नावे आहेत.
 
भूस्खलनामुळे डोंगरावरुन दगड आणि मातीचा ढिगारा भाविकांच्या अंगावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले.
 
 
 
दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करत घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. घटनास्थळी बचावकार्य आणि मदत सुरू आहे. मी सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना चांगले उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे धामी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
Powered By Sangraha 9.0