श्रावणाचा पहिला सोमवार आज; नागपुरातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी

    22-Jul-2024
Total Views |
Shravan
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
श्रावण (Shravan) महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यामुळे नागपुरच्या मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. देशातल्या प्रत्येक शिव मंदिरात 'हर हर महादेव'चा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. आजपासून उत्तर भारतीयांचा श्रावण सोमवार सुरू झाला आहे, मराठी श्रावण सोमवार ऑगस्ट महिन्यात सुरू होईल.
 
उत्तर भारतीय सोमवारच्या तिसऱ्या आठवड्यात मराठी समाजाचा किंवा मराठी भाषिकांचा श्रावण सोमवार सुरू होतो. हिंदू कॅलेंडरनुसार, आज 22 जुलैपासून श्रावण सुरू होत आहे. जी 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या संपूर्ण महिन्यात सर्वांचे देव महादेवाची पूजा केली जाते.