अर्थसंकल्प पूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल होणार सादर

22 Jul 2024 14:30:31

nirmala sitharaman tables economic survey 2024 25
 (Image Source : X/ Screengrab)
 
एबी न्यूज नेटवर्क :
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २२ जुलैपासून सुरू झाले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी २०२४-२५ या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. अधिवेशनादरम्यान सरकार सहा नवीन विधेयक मांडण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्प सादर करण्याबाबत संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात येणार आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष 2024-25 मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 ते 7 टक्के आहे. जागतिक आव्हाने हा देशापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे, असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक आव्हानांमुळे देशाला निर्यातीच्या आघाडीवर धक्का बसू शकतो, असे सरकारचे म्हणणे आहे, परंतु सरकारला याची पूर्ण जाणीव आहे. जागतिक व्यवसायाला आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जागतिक अनिश्चितता भांडवलाच्या प्रवाह वर परिणाम करू शकते.
Powered By Sangraha 9.0