पूर्वेश वांढरेला न्याय मिळविण्यासाठी वैभव डहाणे तहसीलच्या टॉवरवर

20 Jul 2024 00:51:01
- प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

Vaibhav Dahane  
वरोरा :
वरोरा शहरातील मालवीय वार्डात राहणाऱ्या वांढरे कुटुंबातील लहान मुलाचा दूषित पाणी प्याल्याने मृत्यू झाला होता. या घटनेला पंधरा दिवस उलटून सुद्धा न्याय मिळाला नसल्याची खंत स्थानीय सामाजिक कार्यकर्ता वैभव डहाने यांनी व्यक्त केली आहे.
 
या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले असून लहान मुलाला न्याय न मिळाल्यामुळे आज शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून वैभव डहाणे यांनी तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून प्रशासकीय यंत्रणेचा निषेध नोंदवत आंदोलन सुरू केले आहे.
 
वरोरा नगरपालिका तर्फे विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला पाणीपुरवठा करण्यासाठी कंत्राट दिली असून हेच कंत्राट वाढीव भावाने पुन्हा दिल्याने जनसामान्याच्या खिशाला कात्री लावल्याची मत डहाणे यांनी व्यक्त केले.
 
प्रशासनाने अशा कंपनीला काळ्या यादीत टाकून पूर्वेश वांढरे कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करण्याची भूमिका घेत वरोरा शहरातील तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून लक्षणीय आंदोलन सुरू केले आहे.
 
वृत्त लिहत पर्यंत आंदोलक वैभव डहाणे टॉवरवर चढून मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही असल्याचे कळले. यावेळी नगरपालिकेचे सीईओ गजानन भोयर, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार , वार्डातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते मुकेश जीवतोडे यांनी शिवसेनेच्या वतीने या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे व मागण्या पूर्ण न झाल्यास भव्य आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.
Powered By Sangraha 9.0