नागपुरात मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

20 Jul 2024 13:07:10
Nagpur declares holiday due to heavy rains
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
शहरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. तर आज शनिवारी पहाटे पावसाने रौद्र रूप धारण केले. पार्श्वभूमीवर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सर्व जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
 
शहरातील अनेक भागात पाणी साचले असून नागरिकांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे. तसरे अनेक नागरिकांच्या घरात पाणीही शिरले.काही तासातच नागपुरात ९१.३ मिमी पावसाची नोंद झाली.
 
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) नागपूर जिल्ह्यांसह विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान वेळेवर सुट्टी जाहीर झाल्याने अनेक पालकांची तारांबळ उडाली. शहरातील अनेक शाळांकडून प्रशासनाकडून सुटीसंदर्भातील निर्देश वेळेवर मिळाले नाही.वेळेवर अधिकृत सूचना न मिळाल्याने शाळांकडे निघाले. त्यानंतर प्रशासनाकडून सुटीचे निर्देश जारी करण्यात आले. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावाला लागला.
Powered By Sangraha 9.0