बिबट्याचा हल्ला, सहा जखमी

20 Jul 2024 19:12:17

Leopard attack six injured
 (Image Source : Internet/ Representative)
सिंदेवाही :
चंद्रपूर जिल्ह्यातील मोहाळी येथे आज सकाळच्या सुमारास घुसलेल्या तीन बिबट्यांनी सहा जणांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे. सिंदेवाही तालुक्यात शिवनी वनपरिक्षेत्रात हे गाव असून, घनदाट जंगलाने वेढले आहे. आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तीन बिबटे गावात आले. लोक शेतीच्या कामावर जाण्यासाठी बाहेर पडले असतानाच या बिबट्यानी लोकांवर हल्ले केले. यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यात विजय देवगिरीकर, मनोहर दांडेकर, जितेंद्र दांडेकर, सुभाष दांडेकर, ऋतिक वाघमारे, पांडुरंग नन्नावरे यांचा समावेश आहे. हल्ला केल्यानंतर हे बिबटे गावातील घरांत शिरले असून, वन विभागाने तातडीने दखल घेत बिबट्यांनी पकडण्याची मोहीम सुरू केली. आतापर्यंत एक बिबट्या जेरबंद झाला असून, उर्वरित दोन बिबटे पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Powered By Sangraha 9.0