गांजा तस्कर जेरबंद; 9.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

20 Jul 2024 20:06:59
 
Ganja trafficking
 
अमरावती :
बडनेरा पोलिसांनी अंजनगाव बारी रोडवर दोन गांजा तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून गांजा, कार व मोबाईल असा एकुण 9 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेख मोहसीन शेख रशीद (32, रा. फुबगाव, नांदगाव खंडेश्वर) व शेख जुनेद शेख कलीम (31, रा. बुधवारा चौक, नांदगाव खंडेश्वर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
 
18 जुलै रोजी दुपारी 1 ते 2.15 वाजताच्या सुमारास बडनेरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, शेख मोहसिन शेख रशीद व शेख जुनेद शेख अकलीम हे गांजाची वाहतुक करीत आहे. या माहितीवरून पोलिसांनी अंजनगाव बारी रोडवर सापळा रचून एमएच 31 डीसी 4278 या क्रमांकाच्या मारूती सुझुकी कंपणीच्या चार चाकी वाहनाला थांबविले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यात अमली पदार्थाची वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन, त्याच्याजवळील 31 किलो 100 ग्रॅम वजनाचा ओलसर स्वरूपातील गांजा (6 लाख 20 हजार रुपये किमंत), एक जुनी वापरती लाल रंगाची मारूती सुझुकी वॅगनआर कंपनीचे चारचाकी वाहन (3 लाख रुपये किमंत), जुने वापरते दोन मोबाईल (20 हजार रुपये किमंत) असा एकूण 9 लाख 40 हजार रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0