सोमवारी खामगाव आयटीआय मध्ये रोजगार मेळावा

    20-Jul-2024
Total Views |

Employment fair at Khamgaon ITI on Monday
(Image Source : Internet/ Representative)
 
बुलडाणा :
उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सोमवार, २२ जुलै २०२४ रोजी खामगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विशेष रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हंसलपूर येथील सुझुकी मोटर्स गुजरात प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या आस्थापनेसाठी जोडारी, कातारी, संधाता, विजतंत्री, टूल ॲण्ड डायमेकर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, यंत्रकारागीर, पेंटर, तारतंत्री, पत्रे कारागीर, डिझल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, ओटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायातून उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.