मालधक्का इतरत्र स्थानांतरित करु नये!

20 Jul 2024 21:12:52
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली भेट

Dhamangaon Railway Maldhakka 
धामणगाव रेल्वे :
धामणगाव रेल्वे येथील मालधक्का इतरत्र स्थानांतरित करू नये, यामागणीकरिता माल वाहतूक ट्रक मालक संघटनेच्यावतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले. यावेळी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. याप्रसंगी धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड प्रामुख्याने उपस्थित होते.
 
धामणगावचा मालधक्का मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहे. धामणगाव आणि यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांचा रोजंदारीचे माध्यम आहे. परंतु सदर मालधक्का देवळी जिल्हा वर्धा येथे स्थानांतरित होण्याबाबत काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या आहे. त्यामुळे या मालधक्याच्या आधारावर असलेले सर्व रोजगार चिंतित आहेत. त्यामुळे मालधक्का कदाचितही दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित होऊ नये. कारण स्थानांतरित झाल्यास दोन ते तीन हजार परिवार असाह्य होतील. असे निवेदनातून यावेळी सांगण्यात आले. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सुरेश पोळ, अध्यक्ष विलास सहारे, उपाध्यक्ष राजेंद्र पोळ, अब्दुल सादिक तथा सचिव दिपक व्यास यांच्यासह संजय अजबले, विठ्ठल मिर्चापुरे, दिनेश जोशी, निलेश कुंभरे, सुभाष चव्हाण, दिलीप कापडे, शेख अल्ताब, अंशुल बडगैया, मोहम्मद जाकीर, संतोष सूर्यवंशी व संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपरोक्त प्रसंगी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0