नाग नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षाकडे लक्ष द्या : आयुक्त

20 Jul 2024 12:45:46
- कॉर्पोरेशन कॉलनीची केली पाहणी

Commissioner Chaudhary 
नागपूर :
नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे कॉर्पोरेशन कॉलनी येथे नागनदीच्या काठावर सुरक्षेच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेली तात्पुरती टिनाची संरक्षण भिंत बुधवारी रात्री पडली होती. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
 
कॉर्पोरेशन कॉलनी येथे प्रकाश सोळंके यांच्या घरालगत असलेली संरक्षण भिंत मागील वर्षी पूरामध्ये कोसळली होती. यावर्षी नागनदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरु नये म्हणून मनपा प्रशासनातर्फे सँड बॅग्स आणि तात्पुरती टिनाची भिंत उभी करण्यात आली होती. पावसाळयानंतर येथे पक्की संरक्षण भिंत बांधण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मनपाला निधीही प्राप्त झाला आहे.
 
आयुक्तांनी नागरिकांना धोका होऊ नये यासाठी सँड बॅग्स लावणे व यासाठी चैन लिंक Protection तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच टिनाचे तात्पुरते कुंपण पुन्हा लावण्याचे निर्देश दिले. तसेच इतर ठिकाणी सुध्दा तपासणी करुन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांनी सूचना केली. यावेळी अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त प्रकाश वराडे, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0