वीज वितरणाचे तार चोरणारे अटकेत

20 Jul 2024 20:18:35
- 3 लाख 50 हजाराचे साहित्य जप्त
- एलसीबीची कारवाई
 
Electricity thieves(Image Source : Internet/ Representative) 
अमरावती :
ग्रामिण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने वीज वितरण कंपनीचे तार चोरी करणार्या तिघांना अटक करण्यात 17 जुलै रोजी यश मिळविले. भारत श्रीकृष्ण सूर्यवंशी (33,रा. मूर्तिजापूर), प्रकाश मारूती इंगळे (30, रा. बोरगाव वैराळे) आणि मोहम्मद सलीम मोहम्मद हमीद (32, रा. ताजनगर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आरोपींच्या ताब्यातून 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
२ जून रोजी संतोष गोविंद आसोले (29, रा. साईनगर, दर्यापूर) यांनी तार चोरीची तक्रार येवदा पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणात पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात गुप्त माहिती काढली. त्यामध्ये काही आरोपींची नावे पुढे आले. पोलिसांनी संशयांची चौकशी करून आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड, पोलिस त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, सुधीर बावने, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, दिनेश कनोजीया, संजय प्रधान, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. पोलिस चौकशीनंतर आरोपींनी दर्यापूर, खल्लार, अचलपूर तालुक्यातील काही ठिकाणचे तार चोरल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक वाहनासह रोख जप्त केली
Powered By Sangraha 9.0