राज्याला स्थिर सरकार देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट; शरद पवारांचे विधान

20 Jul 2024 15:59:20
Sharad Pawar statement
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. हीच जागा द्या किंवा तीच जागा द्या, असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचे आहे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे जुन्नर विधानसभा मतदारसंघातील आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीनंतर अतुल बेनके हे शरद पवार गटात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0