ऑस्ट्रेलिया सरकारच्या 'या' निर्णयाचा परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर!

02 Jul 2024 18:38:48

Visa for Indian students in Australia becomes more expensive
(Image Source: Internet/Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क : 
ऑस्ट्रेलिययात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी पुढे येत आहे. सरकारने विद्यार्थी व्हिसा शुल्कात दुपटीने वाढ केली आहे. ही व्यवस्थाही १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत नुकत्याच झालेल्या वाढीनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या सरकारने हे पाऊल उचलले.
 
ऑस्ट्रेलियात विद्यार्थी व्हिसासाठी आजवर ७१० ऑस्ट्रेलियन डॉलर लागायचे तर या निर्णयामुळे आता १६०० डॉलर द्यावे लागणार आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतीय विद्यार्थ्यांवर होणार आहे, कारण ऑस्ट्रेलियात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 
सरकारी आकडेवारीनुसार, 2022 मध्ये एक लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियन संस्थांमध्ये शिकत होते. जानेवारी ते सप्टेंबर 2023 या कालावधीत ही संख्या 1.22 लाख होती. आता त्यांना ऑस्ट्रेलियात शिकण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. 
Powered By Sangraha 9.0